देसाईगंज रेल्वेच्या बोगद्याचे काम दर्जाहिन ; ५ तारखेला सुरु होण्याची शक्यता कमी ?
आ. रामदास मसराम यांची प्रत्यक्ष पाहणी ; नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता !
देसाईगंज :-
शहरातील रेल्वे लाईनच्या बोगद्याने रहदारीची मोठी समस्या निर्माण केली होती. पावसाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यातही या बोगद्यातून आवागमन करतांना नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच रहदारी करावी लागत होती नगर पालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनी या बाबीकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधल्याने प्रशासनाने पाणि निस्सारणाचे काम दि. २० मार्च २०२४ पासून सुरु केले. सदरचे काम 5 एप्रिल पर्यंत सुरू रहाणार असल्याची सुचना रेल्वे विभागामार्फत न.प.चे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले होते. मात्र नागरिकांनी सहकार्य करून सुद्धा नागरिकांसाठी दुरुस्ती होत असलेला बोगदा दुरुस्तीच्या नावाखाली पूर्णत ओबळधोबळ होत असून दर्जाहीन असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समजते.
देसाईगंज शहर रेल्वे लाईन मुळे दोन भागात विभागलेले असुन रहदारीसाठी तयार करण्यात आलेल्या बोगद्यामुळे पावसाळ्यात रहदारिची मोठी समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांना बोगद्यात साचलेल्या घाण पाण्यातुन आवागमन करावे लागत होते ही समस्या पावसाळ्या पुरती नव्हे तर हिवाळ्यातही उद्भवत असल्याने देसाईगंज प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रेल्वे प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार, प्रत्यक्ष वस्तुस्थिती दर्शवून समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली, त्यानुसार रेल्वे प्रशासनाने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठी पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु केले. बोगद्यातील पाणी निचरा होण्यासाठी पुर्वीपेक्षा भले मोठे पाईन टाकण्यात आलेले आहे. यामुळे साचलेले पाणी क्षणात बोगद्याबाहेर जाईल. परंतु बोगद्यात नव्याने पाण्याची लेवल मिळविण्याकतीला कॉंक्रीट करण्यात आले. ते कॉन्क्रेट पूर्णत ओबळ ढोबळ असून बोगदा सुरू झाल्यानंतर वाहत चालकांना मोठा त्रास सहन करीत बोगदा पार करावा लागेल. वास्तविक नव्याने कॉन्क्रेट टाकतांना एक लेवल प्लेन मध्ये यायला हवे होते परंतु तसे न करता कंत्राटदाराने त्या कामाला खराब करून टाकले. याबाबत दि. २ एप्रिलला आ. रामदास मराराम यांनी बोगद्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांनी होत असलेल्या गैरसोयीच्या मार्गाची पाहणी केली. यात मोठी अनियमीतप्ता दिसून आल्याने आ. मराराम यांनी संबंधितांनी कामात दुरुस्तीचे आदेश दिले.
यावेळी तहसिलदार प्रिती डूडूलकर न.प.चे कनिष्ठ अभियंता नंदनवार, कंत्राटदाराचे सुपरवाईजर कनिष् अभिन्यनता आरोग्य विभाग प्रमुख गेडाम, रेल्वे सल्लागार समिती सदस्य भास्कर डांगे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जिवन पा.नाट, सागर वाढई, युवक काँग्रेस अध्यक्ष अमर भरे, जावेद शेख, कमलेश बारस्कर, ज्ञानदेव पिलारे,जितू चौधरी, धर्मेंद्र लांडे, व कार्यकर्ते उपस्थित होते.
येत्या ५ तारखेपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला बोगदा सुरू होणार की नाही यावर प्रश्ननिर्माण होत आहे
पत्नी कडून मुलासमोर अश्लील शिव्यांची लाखोळी वाहत असल्याने संतापलेल्या तलाठी पतीने संपविली जीवनयात्रा
मी मेल्यावर माझा चेहरा पत्नीला दाखवू नका
अकोला : पत्नीकडून पतीचा मानसिक व आर्थिक प्रचंड छळ आणि मुलासमोर अश्लील शिव्यांची लाखोळी वाहत असल्याने त्याला कंटाळून पाच दिवसांपासून उपाशी पतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. मोबाइलवर स्टेटस ठेऊन आत्महत्येसाठी पत्नीला जबाबदार धरले आहे
मृत्यूनंतर माझा चेहरा सुद्धा पत्नीला दाखवू नका, असे त्यामध्ये नमूद आहे. शीलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते तेल्हारा तहसील कार्यालयांत तलाठी म्हणून कार्यरत होते.
तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी " व्हॉटसॲप " वर एक स्टेटस ठेवले. त्यामधून तेलगोटे यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले. शिलानंद तेलगोटे यांनी मृत्यू पूर्वीच्या या स्टेटस मध्ये पत्नी आपला मानसिक छळ करते. मृत्यूनंतर चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असेही नमूद केले. पोलिसांनी तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
तेलगोटे यांनी " व्हॉटसॲप स्टेटस " मध्ये पत्नीने आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले होते. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केल्याची माहिती आहे. या घटनेवरून परिसरत हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा. मी दिनांक 30/03/2025 रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते.
आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे.
माझ्या मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं पोस्टमार्टम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल असे नमूद केले आहे
तिहेरी विचीत्र अपघातात सात ठार तर २५ गंभीर जखमी
अकोला:-
आज दि .२ एप्रिल सकाळी खामगाव ते शेगाव रोड वर एस टी बस, बोलेरो आणि लक्झरी बस चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून 25 जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघात पुणे परतवाडा बस ला बोलेरो ने मागून धडक दिली नंतर मागून येणाऱ्या लक्झरी बस ने दोन्ही वाहनांना धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ते शेगाव रोडवर जयपुर लांडे फाटा समोर हा विचित्र अपघात झाला आहे. पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला मागून आधी एका चारचाकी वाहनाने धडक दिली, त्यानतंर एका खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. या तिहेरी अपघातात गाड्यांचेही बरेच नुकसान झाले. आज पहाटे पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 लोकं जखमी झालेत. त्यापैकी 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी तिहेरी अपघातामुळे मोठी खळबळ माजली असून अनेकांच्या जीव गेल्याने हळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ खामगाव शहर पोलिस चौरस स्टेशन चे ठाणेदार राजेश पवार हे आपल्या कर्मचाऱ्यासमवेत पोहचले तसेच स्थानिक तहसीलदार सुनील पाटील ही पोहचले. वाहनांमध्ये अडकलेल्या रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मधील गंभीर रुग्णांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. सात लोक मृत्युमुखी पडले आहेत
अपघातात जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो म्हणून अपघात करणाऱ्या चालकाने फेकले पुलावरून
नागपूर:-
जिल्ह्यातून मानवतेला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. येथे रस्ते अपघातातील जखमीला आरोपीने लोकांच्या गर्दीमुळे रुग्णालयात नेण्याचे नाटक केले. मग तो थोडा पुढे गेला आणि त्यांना एका पुलाखालून फेकून देऊन पळून गेला. यानंतर जखमी व्यक्ती बराच वेळ वेदना सहन करत राहिला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. हे प्रकरण नागपूर जिल्ह्यातील मिहान सेझला लागून असलेल्या कर्करोग संस्थेशी संबंधित आहे. मृत व्यक्तीचे नाव कृष्णा बोरसे असे आहे. कृष्णा बोरसे हे त्यांच्या दुचाकीवरून कामावरून घरी परतत होते. तेवढ्यात एका भरधाव गाडीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमींभोवती लोकांची गर्दी जमली. हे पाहून आरोपी चालक जखमी व्यक्तीला सोबत नागपूरच्या दिशेने रुग्णालयात घेऊन गेला. यानंतर, त्याने जखमी व्यक्तीला पुलाखाली फेकून दिले आणि पळून गेला.
पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी नागपूरच्या सरकारी रुग्णालयात कृष्णा नावाच्या व्यक्तीला दाखल केले आहे का हे शोधून काढले. पोलिस तपासानंतर असे आढळून आले की कृष्णा नावाच्या कोणत्याही जखमी व्यक्तीला नागपूरमधील कोणत्याही सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. यानंतर पोलिसांना संशय आला की जखमी व्यक्तीला कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की एक जखमी व्यक्ती चिच भवन पुलाखाली पडून आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात आपल्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने दिल्या गेली आणि भोळ्या भाबड्या जनतेने याच जाहीरनाम्यावर म्हणजे पोकळ आश्वासनावर विश्वास ठेवून राज्यात भारतीय जनता पक्षाचा सरकार प्रस्थापित केला गेला परंतु हे सरकार खोटारडा आहे हे आता जनतेच्या लक्षात यायला लागले आहे.
भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते आणि सत्तेत येतात सरड्यासारखे रंग बदलून यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्या गेली.म्हणजे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ न केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसोबत विश्वासघात केला अनेक शेतकरी पिक कर्ज माफ होईल ही अशा उराशी बाळगून जीवन जगत असताना त्याच्या पदरी निराशाच पडली.
आज राज्यातील कित्येक शेतकरी पिक कर्ज भरू शकले नाही त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागला ज्याने पीक कर्ज भरला त्याला मोठी तारेवरची कसरत करून उसनवारे पैसे घेऊन पीक कर्ज भराव लागलं ही एक शोकांतिकाच म्हणावे लागेल.जे शेतकरी पीक कर्ज भरू शकले नाहीत त्याच्या कपाळी थकबाकी कर्जदार शेतकरी म्हणून नोंद झाली.
राज्यातील सरकार धन दांड्याचे सरकार आहे हे सरकार शेतकरी विरोधक आहे असं म्हणाला काहीही हरकत नाही निवडणुका येतात जातात तो काही विषय नाही शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसून तुम्ही दिमागदार बाणा दाखवत असाल तरी पण राज्यातील जनता तुमचे कारनामे उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि तो तुमचा माज उतरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे मात्र खंत आहे.
बल्लारपूर येथील तहसीलदार अडकला लाप्रवीच्या जाळ्यात, शेतकऱ्याकडून २ लाख २० हजारांची लाच मागणे पडले महागात
तलाठी धूम ठोकत पसार झाला
बल्लारपूर:-
राज्यात गेल्या काही दिवसांत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला असून अनेक छोटे-मोठे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लापूरचे तहसीलदार लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत लाच लुचपत प्रतीबंधक विभागाने तहसलीदार अभय अर्जून गायकवाड यांना अटक केली असून यातील दुसरा आरोपी असलेला तलाठी सचीन रघुनाथ पुळके हा फरार आहे.
सध्या, ए.सी.बी.(A.C.B.)कडून आरोपी तलाठी पुळके याचा शोघ घेण्यात येत आहे.
बल्लारपूरचे तहसीलदार आणि त्यांचा सहकारी तलाठी असे दोघेही लाच प्रकरणात अडकले आहेत. फिर्यादीने स्वतःच्या शेतातील माती आणि मुरूमाचे उत्खनन केले होते.
मात्र, हे उत्खनन अनधिकृत असल्याचे सांगत संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. अनधिकृत गौण खनिज उत्खननाचे हे प्रकरण असून मिटविण्यासाठी लाच मागितली होती.
संबंधित महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे २ लाख २० हजार रुपयांच्या रक्कमेची मागणी केली होती.
लाच म्हणून ठरलेल्या या रकमेतील १ लाख २० हजार रुपये शेतकऱ्याने त्यांना देऊ केले होते. तर, उर्वरीत १ लाख रुपये शिल्लक असल्याने लाचखोरांनी सततचा तगादा लावला होता.
त्यामुळे, वैतागलेल्या शेतकऱ्याने या लाचखोरीची ए.सी.बी.(A.C.B.)कडे तक्रार केली. पडताळणी केली असता लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती
त्यानंतर, ए.सी.बी.(A.C.B.)च्या पथकाने सापळा रचून महसूल अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली. दरम्यान, ए.सी.बी.(A.C.B.)च्या कारवाईत तहसीलदार
अभय गायकवाड आणि कवडजई सांजाचे तलाठी
सचिन पुकळे त्यांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. ए.सी.बी.(A.C.B.)ने तहसीलदाराला ताब्यात घेतले असून तलाठी पुकळे धुम ठोकून फरार आहे. याप्रकरणी, ए.सी.बी.(A.C.B.)कडून पुढील कारवाई सुरू आहे.
संशयाच्या भुताने पछाडलेल्या पतीने गळा आवळून संपविले पत्नीला
रावेर :-
संशयाच्या भुताने पछाडलेल्या पतीने गळा आवळून पत्नीची जीवनयात्रा संपवल्याची घटना रावेर तालुक्यातील अभोडा बुद्रुक येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. आशाबाई संतोष तायडे वय 38 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यातील अभोडा बुद्रुक येथील संतोष शामराव तायडे हा पत्नी आशाबाई सोबत राहत होता. आशाबाई रात्री एका व्यक्तीसोबत बोलत होती. याबाबत संतोष तायडे याने पत्नी आशाबाईला कोणासोबत बोलत होती असे विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतोषला याचा राग आला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना आज सकाळी अभोडा बुद्रुक येथे घडली.
घटना घडल्यावर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना दिली. तात्काळ घटनास्थळी डी वाय एस पी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, उप निरीक्षक तुषार पाटील हजर झाले. मृतदेहाचे शव विच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
आरोपी पती संतोष शामराव तायडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे
एका तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या इसमास , पत्नीनेच दिले पोलीसांच्या ताब्यात
नागपूर : ओळख लपवून महिलांसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून त्याचे आक्षेपार्ह फोटो, व्हीडिओ काढण्याचा आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या आरोपीची पत्नीच पीडित मुलीसाठी धावून आली. तिनेच हे प्रकरण समोर आणलं आहे.
नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अब्दुल शरीफ कुरेशी (वय 33) असं आरोपीचं नाव आहे. तो टेका-नाका परिसरात पानटपरी चालवतो. त्याचं चार वर्षांपूर्वीच लग्न झालं आहे. त्याला तीन वर्षांची मुलगी सुद्धा आहे. असं असलं तरी, आरोपी स्वतःची ओळख, वय आणि लग्नाबद्दलची माहिती लपवून इतर महिला आणि मुलींसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत होता. त्या महिलांना लग्नाचं खोट आश्वासन द्यायचा.
या आरोपीनं चार ते पाच महिलांची अशी फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. पण, सध्या 19 वर्षांची एक पीडित मुलगी समोर आली आहे. तिनं पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अब्दुलला 29 मार्चला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 64, 69 या कलमानुसार बलात्कार आणि खोटं आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 19 वर्षीय मुलगी ही भंडारा जिल्ह्यातली रहिवासी आहे. तिची सप्टेंबर 2024 मध्ये आरोपी अब्दुलसोबत ओळख झाली. एका महाप्रसादाच्या कार्यक्रमात अब्दुल तिला भेटला. पण, यावेळी त्यानं स्वतःचं नाव बदलून सांगितलं. तसेच वय सुद्धा केवळ 24 वर्षे सांगितलं. त्यानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं. दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तसेच त्यानं तिला लग्नाचं आश्वासन सुद्धा दिलं होतं. पण, हा आपल्यासोबत खोटं बोलतोय असं तिला चार महिन्यानंतर समजलं.या व्यक्तीनं वय, नाव सगळं खोट सांगून आपली फसवणूक केली असल्याचं तिच्या लक्षात आलं.
मुलगी नागपुरात शिकायला राहत असल्यानं आणि कोणाचा पाठिंबा नसल्यानं शांत होती. पण, या प्रकरणात आरोपीच्या पत्नीनेच या पीडित मुलीची मदत केली. तसेच तिला पोलीस ठाण्यापर्यंत आणण्याचं काम केलं. आरोपीच्या पत्नीमुळेच हे प्रकरण समोर आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्दुल हा पॉर्न व्हीडिओ बघून स्वतःच्या पत्नीकडेही तशीच मागणी करायचा. तिनं मागणी पूर्ण केली नाही, तर तिला मारहाण करून तिचा शारीरिक छळ करायचा. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणं होत होती. पतीच्या या त्रासाला कंटाळून ती 6 महिन्यांपासून माहेरी राहत आहे. तिनं पोलिसांत शारीरिक छळाबद्दल तक्रार दाखल केली होती.
तो या महिलांसोबत फक्त ओळख लपवून बोलतच नाही, तर त्यांच्यासोबत संबंध ठेवून त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. तसेच त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचंही तिला व्हॉट्सअपर दिसलं. त्यानंतर तिनं सगळे पुरावे गोळा करून पीडित महिलांना फोन केले. पण, महिला भीतीपोटी तक्रार द्यायला तयार नव्हत्या. यापैकी फक्त एक 19 वर्षीय पीडित मुलगी समोर आली. असले प्रकार करणाऱ्या पतीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं तिनं ठरवलं. यानंतर पतीच्या व्हॉट्सअप चॅट आणि फोटोंवरून तो इतर महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं तिला दिसलं.
तिनं आरोपीच्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात जात ओळख लपवून आणि लग्नाचं खोट आश्वासन देऊन वारंवार बलात्कार झाल्याची तक्रार पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल केली. आरोपीनं तिला फोटो व्हायरल करण्याचीही धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि खोटं आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटकही केली. आरोपीनं आणखी 4-5 महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा संशय पोलिसांना आहे. आता पोलीस त्यादृष्टीनं तपास सुरु आहे
शिक्षीका राहायची घरी, विद्यार्थ्यांना शिकवी मजुरीकरी
शिक्षीकेला केले तात्काळ निलंबित
भोर : आज नौकरी मिळविण्यासाठी बेरोजगार तरुणांना धडपड करावी लागते मात्र नौकरी मिळाली म्हणून गौरहजर राहून स्वतःऐवजी दुसऱ्या महिलेस वर्गात अध्यापन करायला लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या महिला शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. पुण्यातील भोर नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळा क्रमांक एकमध्ये हा प्रकार घडला आहे.
भारती दीपक मोरे असं सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या उपशिक्षिकेचं नाव आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्याधिकारी गजानन शिंदे आणि प्रशासन अधिकारी राजकुमार बामणे यांनी अचानक शाळेला भेट दिली. त्यावेळी शिक्षिका भारती मोरे या अनुपस्थित असल्याचे आढळले. मात्र, रजिस्टरवर मोरे यांची सही होती. विशेष म्हणजे त्यांच्या जागी दुसऱ्या महिला होत्या. ती महिला मोरे शिक्षिकेच्या जागेवर विद्यार्थ्यांना शिकवत होत्या.
या दरम्यान या गोष्टीचा तपास करण्यात आल्या. भारती या त्या महिलेला ठराविक रक्कम देऊन अध्यापनासाठी ठेवले असल्याची खात्री झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आणल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी भारती मोरे यांना खुलासा देण्याचे आदेश दिले. मात्र, त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
भारती मोरे यांच्यावर विनापरवानगी गैरहजर राहणे, विनापरवानगी मुख्यालय सोडणे, कर्तव्यात निष्काळजीपणा करणे, गैरहजर कालावधीत खासगी व्यक्तीला वर्गाचा ताबा देणे, वर्ग उघडे ठेवून चाव्या त्रयस्त व्यक्तीकडे देणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस अडथळा निर्माण करणे, या कारणांमुळे निलंबन करण्यात आले. नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांची त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.समितीचा अहवाल येईपर्यंत मोरे यांचे निलंबन राहणार आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
राहुलच्या मृतदेह आढळला विहीरीत,पोलिसांचा तपास सुरू
चिमूर
चिमूर तालुक्यातील मदनापूर शिवारात आज सकाळी एका युवकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल मंगल शेंडे (वय २१, रा. मदनापूर) असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा गेल्या दोन दिवसांपासून घरी नव्हता. त्याचे आई-वडील मदनापूर हेटी येथे राहतात. राहुल हा मदनापूर येथील आजीकडे राहून ट्रॅक्टर चालक म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. मदनापुरातील बिरजे यांच्या विहिरीच्या काठावर वडाच्या झाडाच्या सावलीत तो झोपला होता. आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास काही नागरिकांना विहिरीत राहुलचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच मदनापूर ग्रामस्थांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
राहुलच्या मृत्यूमुळे मदनापूर गावात शोककळा पसरली आहे. चिमूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
वाघाने तोडले शेतकऱ्याचे लचके,शेतात पाण्याची व्यवस्था करीत असताना केला हल्ला
लाखांदूर:-
खैरी / पट, विहिरगांव. डांभेविरली व टेंभरी परिसरात गेल्या १० १५ दिवसापासून वाघाचे दर्शन होत असल्याची चर्चा होती. तर वाघाने जनावरांना ठार मारल्याचे ऐकण्यात येत असतानांच दि. 30 मार्च च्या सांयकाळी ५ वाजताच्या दरम्यान खैरी / पट येथील डाकराम देशमुख नामक शेतकरी मोटार पॅम्प सुरु करण्याकरीता गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांचेवर उडी घेऊन डाकराम चा फरश्याच पाडला व लचके तोडले. डाकराम घरी न परतल्यामुळे घरच्या लोकांनी व गावकऱ्यांनी त्याचा शोधाशोध केला शेवटी आज पहाटे खैरी / पट स्मशान भूमी जवळ त्याचे अर्धवट प्रेतच आढळले वाघाने त्याच्या शरीराचे रात्रभर दोन तुकडेच केले होते. सदर परिसर हा वाघ प्रतिबंधित क्षेत्र असुन सुद्धा व वाघ जनावरांना ठार करीत असतांना वनविभाग लांखादुर मात्र झोपतच होते. प्रेत शवविच्छेदनास ग्रामीण रुग्णालय लाखांदुर येथे नेण्यात आले असुन वनविभाग व लाखांदुर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अहेरी येथे गाव माझा उद्योग फाउंडेशन प्रकल्पाचे शुभारंभ
उद्योगासाठी महिलांना मिळणार चालना
संसारोपयोगी साहित्य स्वस्त दरात उपलब्ध होणार
अहेरी:- येथील हसन बाग हॉटेल लगत गाव माझा उद्योग फाउंडेशन प्रकल्पाचे शुभारंभ सोमवार 31 मार्च रोजी अहेरी नगर पंचायतीचे नगर सेविका तथा सभापती नौरास शेख यांच्या वतीने करण्यात आले.
शुभारंभ समारंभाच्या अध्यक्षस्थानी गाव माझा उद्योग फाऊंडेशनचे जनरल मॅनेजर राजकपूर भडके हे होते तर मंचावर उदघाटन स्थानी नगर सेविका नौरास शेख होते, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, कांता भडके, आम्रपाली कोसंकर, संजना नेवारे, दीपमाला झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम नगर सेविका नौरास शेख यांच्या शुभहस्ते फित कापून प्रकल्पाचे विधिवत व शाही थाटात शुभारंभ करण्यात आले.
त्या नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलीत व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून गाव माझा फाऊंडेशनचे जनरल मॅनेजर राजकपुर भडके यांनी, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांचे हात बळकट करण्यासाठी गाव माझा उद्योग फाउंडेशन सदैव तत्पर असून शासनाचे 'लखपती दीदी' या अभिनव उपक्रमातून महिलाना लखपती करण्याचे लक्ष्य व उद्देश असल्याचे आवर्जून सांगून या प्रकल्पात संसारोपयोगी व जीवनावश्यक साहित्य स्वस्त व माफक दरात मिळणार असल्याचे व याचा लाभ प्रत्येकानी घेण्याचे आवाहन राजकपूर भडके यांनी केले.
याचवेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, रियाज शेख यांनी 'गाव माझा उद्योग फाउंडेशन' हे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व उन्नतीसाठी धडपड करीत असल्याने या माध्यमातून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महिला व्यवसाय व उद्योगाच्या क्षेत्रातून विकासाची उत्तुंग झेप घेतील असा आशावाद व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांता भडके यांनी तर सूत्रसंचालन प्रांजली मेकर्तीवार, रुपाली जाकेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार तनवी उराडे यांनी मानले. यावेळी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील बहुसंख्य महिला उपस्थित होते.
पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवानीशी मारणाऱ्या पतीस जन्मठेप
नांदेड:-
मोटर सायकल घेण्यासाठी माहेरून 80 हजार रुपये घेऊन ये म्हणून सतत शारीरिक व मानसिक छळ करून एका दिवशी पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून तिचा खून करणाऱ्या सिरंजनी तालुका हिमायतनगर येथील एका निर्दयी पतीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भोकर चे न्यायाधीश वाय, एम, एच, खरादी यांनी दि. 28 मार्च रोजी जन्मठेप व 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त 5 वर्ष सश्रम कारावासची शिक्षा सुनावली आहे. सौ महानंदा गजानन पिटलेवाड राहणार शिरंजनी ता. हिमायतनगर या विवाहितेस तिचा पती गजानन नारायण पिठलेवाड वय 30 हा मोटर सायकल घेण्यासाठी बाहेरून 80 हजार रुपये घेऊन ये म्हणून सतत शारीरिक व मानसिक छळ करत होता.
दि. 15 जुलै 2020 रोजी सदरील विवाहितेची सासू व सासरा हे शेतात गेले असता ती घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्याशी पती गजानन पिटलेवाढ ने पैशाच्या मागणीवरून वाद घातला यात तिने प्रतिसाद न दिल्याने राग अनावरण झाला. गजानन पिटलेवाड ने घरासमोरील जुन्या मोटार सायकल मधील पेट्रोल काढले व ते पत्नी सौ. महानंदाच्या अंगावर टाकून दिला व पेटून दिले यात ती मोठ्या प्रमाणात जळाली असल्याने तिला उपचारार्थ शासकीय रुग्णालय येथे नेण्यात आले यावेळी तिच्या माहेरच्यांनी हिमायतनगर पोलिसात रीतसर तक्रार दिली . यावर रुग्णालयात जाऊन गंभीररित्या जळीत असलेल्या विवाहितेच्या मृत्यूपूर्व जबाब घेण्यात आला. परंतु उपचार दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गजानन पिटलेवाड विरुद्ध खून व शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक भगवान बी कांबळे यांनी केला व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे दोषारोप पत्र दाखल केले. दरम्यान काळात सदरील प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोग्यता एड. सौ. अनुसया शिवराज डावकरे यांनी महत्त्वाचे एकूण 11 साक्षीदार तपासले तसेच अंतिम युक्तीवाद दरम्यान त्यांनी लेखी युक्तिवादासोबत मा. उच्च न्यायालयतील न्यायनिवाडे दाखल केले.
त्याचबरोबर मयत विवाहितेचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा करण्यात यावी अशी विनंती मा. न्यायालयास केली. दुर्दैवी मयत महानंदा पिटलेवाड हिचा मुक्ती पूर्व जबाब या प्रकरणात महत्त्वाचा ठरला व तो निर्दयी पती गजानन पितलेवाड या प्रकरणी दोषी ठरला यावरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय भोकर चे न्यायाधीश वाय.एम.एच. खरादी यांनी दि. 28 मार्च 2025 रोजी गजानन पिटलेवाड यास जन्मठेप व 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर सदरील खटल्यास दरम्यानच्या पैरवी अधिकारी म्हणून जमादार रमेश आडे यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.
दारुड्या मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांवर केला कुऱ्हाडीने हल्ला , आई - वडील गंभीर जखमी
अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथे दारुड्या मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. शेत वाटणीच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी विजय समाधान तेलगोटे (३८) रा. घोडेगाव, ता. तेल्हारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ विनोद समाधान तेलगोटे हा दारूच्या नशेत आई-वडिलांशी वारंवार वाद घालत असे. १९ मार्च रोजी रात्री ११ वाजता त्याने आई-वडिलांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
घटनेनंतर तेल्हारा पोलिसांनी जखमींना तेल्हारा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलवण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीनंतर २० मार्च रोजी रात्री २.३० वाजता तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा अमोल सोळंके करीत आहेत.
लोखंडी पत्रे घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होवून अनखोडा नजीक उलटला ,एक गंभीर तर तीघे जण जखमी
आष्टी -
आष्टी - चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील अनखोडा येथील वळणावर लोखंडी पत्रे वाहतूक करणारा ट्रक अनियंत्रित होवून उलटला. यात विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाल्याची घटना दिनांक 30 मार्च 2025 रविवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली.
रमेश शेरकी वय 60 वर्ष रा. आष्टी, हे गंभीर असून मनोजकुमार दिलीप महंतो ड्रायव्हर,धिरज रामकिशोर ठाकुर कन्डक्टर,धनसींग केपी चौधरी तीन्ही रा.सुपेला भिलाई (छतिसगढ)अशी जखमींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, भिलाईवरून गडचिरोली - आष्टी मार्गे ट्रक क्रमांक CG 07 CR 4622 हा लोखंडी पत्रे घेवुन जात होता दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास अनखोडा येथील वळणावर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक अनियंत्रित झाला व तो पलटी झाला. याच वेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटीवर ट्रक मधील लोखंडी पत्रे पडली यामुळे दुचाकीस्वाराला मार लागला तर ट्रकमधील तिघे जण जखमी झाले. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे पोलिस पथकासह घटना स्थळी दाखल झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. भर रस्त्यात ट्रक पलटी झाल्याने बराच वेळ आष्टी चा मोर्शी मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतुक सूरू कऱण्यात आली.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे
त्या अपघातात गंभिर जखमी झालेल्या शिक्षीका शालिनी खोब्रागडे यांचे उपचारादरम्यान निधन
गोंडपिपरी : पंचायत समिती
गोंडपिपरी अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा आक्सापूर येथे शिक्षीका म्हणून कार्यरत असलेल्या शालिनी खोब्रागडे यांचे काल दि. 29 रोजी रात्री नागपूरात उपचारादरम्यान निधन झाले. सोमवारी कोठारी गोंडपिपरी मार्गावर झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. शालिनी खोब्रागडे यांचे बल्लारपूर तालुक्यातील बाम्हणी येथे घर आहे. सोमवारी त्या कन्या विद्यालयाचे प्राचार्य पोटे यांच्या चारचाकी वाहनाने आक्सापूर येथे शाळेत जात होत्या. दरम्यान कोठारी आक्सापूर मार्गावर झालेल्या अपघातात शालिनी खोब्रागडे, मुख्याध्यापक पोटे व वडस्कर हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्यान खोब्रागडे व पोटे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शालिनी खोब्रागडे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच आप्तपरिवार आहे. खोब्रागडे या 56 वर्षाच्या होत्या. आज बाम्हणी येथे त्यांच्या पार्थीवावर अंतीम संस्कार करण्यात आले. एका उपक्रमशिल, विद्यार्थीप्रिय शिक्षीकेचा अपघातात निधन झाल्याने परिसरात शोक व्यक्त केल्या जात आहे.
रमझान ईद च्या आदल्या दिवशी मशीदीमध्ये स्फोट
बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावातील मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रमजान ईदच्या काही तास आधी, पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी तातडीने धाव घेतली असून बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमने तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेत मशिदीच्या फरशीला आणि बांधकामाला तडे गेले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.स्फोटानंतर पोलीस विभागाने त्वरीत हालचाल करत दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अज्ञात माथेफिरूने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस घटनेच्या मागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास करत आहेत.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) वीरेंद्र मिश्र यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कावत सकाळपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत. स्फोटामागील सत्य उघड करण्यासाठी पोलीस यंत्रणा कसून तपास करत आहे.
गेल्या काही महिन्यांत बीड जिल्हा विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच रमजान ईदच्या काही तास आधीच मशिदीत स्फोट झाल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
घटनास्थळी नमुने जमा करण्यात आले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. पुढील तपशील अधिकृत अहवालानंतरच समोर येईल.
नक्षलवाद्यांनी केली एका इसमाची हत्या, भामरागड तालुक्यातील घटना
गडचिरोली, ता. ३०: नक्षल्यांनी शनिवारी (ता. २९) रात्री भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस ठाण्यांतर्गत जुव्वी गावातील एका प्रतिष्ठित इसमाची गळा दाबून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुसू गेब्बा पुंगाटी (६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
शनिवारी रात्री नक्षली जुव्वी येथील पुसू पुंगाटी यांच्या घरी गेले. त्यांनी पुसू यांना झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि टॉवेलने गळा दाबून त्यांची हत्या केली. पुसू पुंगाटी हे गावातील प्रतिष्ठीत नागरिक होते. त्यांना पत्नी आणि दोन विवाहित मुले आहेत. मोठा मुलगा चिन्ना पुंगाटी हा एटापल्ली येथील राजे धर्मराव महाविद्यालयात प्राध्यापक, तर लहान मुलगा किशोर पुंगाटी हा अहेरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतो. प्रा. चिन्ना पुंगाटी यांची पत्नी पोलिस शिपाई आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात पुसू पुंगाटी यांनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. मात्र, नक्षल्यांनी त्यांची काल हत्या केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. पुसू पुंगाटी यांचा नक्षली वा पोलिसांशी काहीही संबंध नव्हता. तरीही त्यांची हत्या करण्यात आली. घटनास्थळी कुठलेही पत्रक किंवा बॅनर आढळले नाही. त्यामुळे हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत तपास सुरु आहे. मात्र, नक्षल्यांनी हत्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
यंदा १ फेब्रुवारीला नक्षल्यांनी भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची हत्या केली होती. त्यानंतर काल पुसू पुंगाटी यांची हत्या केल्याने खळबळ माजली आहे
जन्मदात्याने मुलीवरच केला अत्याचार म्हणून न्यायालयाने दिला २० वर्षाचा सश्रम कारावास
अकोला :- अकोला जिल्ह्यातून एक घृणास्पद आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं सिद्ध झाल्यानं त्याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
मूर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवलं. पीडित मुलीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने पूर्ण केली. न्यायालयाने सरकार पक्षाचे ६ साक्षीदार तपासले आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरवलं. न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी ६ महिने कारावास भोगावा लागणार आहे.
आपीएस सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन , ट्रकने दिली कारला जब्बर धडक
मुंबई:-
आय.पी.एस.(I.P.S.) सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते
त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला.
सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आय.पी.एस.(I.P.S.) अधिकारी आहेत. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलीसमध्ये पोर्ट झोनचे डी.सी.पी.(D.C.P.) म्हणून कार्यरत होते.
सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते.
त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला.
या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती तेलंगणा पोलीसांना मुंबई पोलीसांना कळवली आहे.
स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले.
यानंतर १९९६ साली विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलीस खात्यातच ते रमले.
आतापर्यंत त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावली
अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई
तर पोलीस अधीक्षक म्हणून सी.आय.डी. अमरावती येथे सेवा बजावली आहे.
पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी,
नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे.
एस.पी. डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एम.पी.डी.ए. अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलीस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.
सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.